पर्युषण काळात मुंबईतील जैन मंदिरे भाविकांसाठी दोन दिवस उघडणार, सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली-कोरोनादरम्यान सुप्रीम कोर्टाने मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिरांना पर्यूषण पर्वाच्या शेवटच्या 2 दिवशी म्हणजेच, 22 आणि 23 ऑगस्टला भाविकांसाठी उघडण्याची परवानगी दिली आहे. यादरम्यान, मंदिर प्रशासनाला केंद्र सरकारचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॉसिजर (एसओपी) फॉलो करावे लागतील. चीफ जस्टिस एसए बोबडे यांच्या बेंचने स्पष्टपणे सांगितले आहे की, ही सवलत इतर धार्मिक स्थळांना आणि गणेश चतुर्थीदरम्यान दिलेली नाही.

तिकडे, लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात 9 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. लालू झारखंडच्या रांचीमधील रिम्स हॉस्पीटलमध्ये दाखल आहेत. नवीन सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली जाईल.

देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 29.10 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत विक्रमी 61 हजार 873 रुग्ण बरे झाले. तर 68 हजार 518 रुग्ण संख्या वाढली आणि 981 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 75% पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी दिल्लीत सर्वाधिक 90.1% लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना अपडेट्स…

  • केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी शुक्रवारी ट्वीट करुन सांगितले की, देशातील रिकव्हरी रेट 74.3% झाला आहे.
  • देशात कोरोना चाचणीसाठी लॅबची संख्या 1,504 करण्यात आली आहे. यातील 978 सरकारी आणि 526 खासगी लॅब आहेत.
  • पंजाब विधानसभेत येणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना आपली निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट सबमिट करावी लागेल. विधानसभेचे सत्र 28 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
  • कोलकाताचे असिस्टेंट पोलिस कमिश्नर उदय कुमार बनर्जी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *