करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत स्वतंत्र कोव्हिड सेंटर तसंच वैद्यकिय व्यवस्था उभी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुसज्ज कोव्हिड सेंटर फक्त १८ दिवसांत बांधून पूर्ण केलं आहे. या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *