कोरोनाने मृत्यू झालेले राष्ट्रवादीचे कर्मचारी गौतम जाधव यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ लाखाचा धनादेश सुपूर्द…

मुंबई दि. ७ ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन कर्मचारी  गौतम जाधव यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता त्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ५ लाखाचा धनादेश देण्यात आला.
याशिवाय बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक आशिष दामले यांनीही गौतम जाधव यांच्या पत्नीला १ लाखाचा धनादेश देवून मदतीचा हात पुढे केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *