कोरोनाने मृत्यू झालेले राष्ट्रवादीचे कर्मचारी गौतम जाधव यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ लाखाचा धनादेश सुपूर्द…

मुंबई दि. ७ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन कर्मचारी  गौतम जाधव यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता त्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ५ लाखाचा धनादेश देण्यात...

महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड वाढविण्याचे केंद्राचे आदेश!

महाराष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या करोना रुग्णांमुळे केंद्र सरकार चिंतीत झाले आहे. केंद्र सरकारने यासाठी पुढील महिन्यात १३ ऑक्टोबरपर्यंत किती रुग्ण वाढतील याचा अंदाज बांधून राज्यातील रुग्णालयांत ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलटरचे...

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा:कोल्हापुरात मराठा समाजाची गोलमेज परिषद, पंधरा ठराव आज परिषदेत करण्यात आले मंजूर

कोल्हापूर-सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाज संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले...

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा – अजित पवार                                     

पुणे- 'कोरोना'च्या संकटकाळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना...

सैन्यदलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणीं; शरद पवारांनी पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट.

मुंबई - सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांचे उपजीविका व सुरक्षेचे प्रश्न...

मुंबईत रुग्णदुपटीच्या वेगात मोठी वाढ

मुंबई - ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत नियंत्रणात येऊ घातलेली मुंबईतील कोरोनास्थिती पुन्हा एकदा बिघडू लागली आहे. गणेशोत्सव आटोपल्यापासून शहरात दररोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यातच बोरिवली, दहिसर,कांदिवली,...

केंद्रसरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो – शरद पवार

शरद पवारांनी कांदा निर्यात बंदीबाबत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री  पियुष गोयल यांची दिल्लीत घेतली भेट... मुंबई  - निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात...

छत्रपतींच्या काळात एक इंजिनिअर म्हणून बरेच काही शिकता आलं असतं – जयंत पाटील

मुंबई - एक इंजिनिअर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबाबत मला पूर्वीपासूनच एक कुतूहल आहे. ते भव्यदिव्य किल्ले... त्यांचे बांधकाम... दगडांमध्ये कोरलेल्या वास्तू... सर्व काही अप्रतिम आहे. बरेचदा वाटतं त्याकाळात जर...

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’चा अनुभव

मुंबई- पावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच मुंबईत वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. गेले दोन दिवस मुंबईकरांना ऊन्हाचे वाढीव चटके बसले असले असून, पुढील दोन ते तीन दिवस ‘ताप’दायक...

“मुंबईतील सर्व ट्रेन्स, कार्यालयं १ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; शाळा जानेवारीत उघडा”

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनंतर राज्यातील उद्योग, व्यवसायांसह रेल्वे व सावर्जनिक वाहतूक सेवा बंद होती. ती आता अनलॉक प्रक्रियेत हळूहळू सुरळीत होत आहे. मात्र, अद्यापही पूर्णपणे सर्व ठिकाणची...